एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना टोला लागवलाय, एक व्यक्ती किती वेळा रंग बदलू शकतो असं म्हणत शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय, तर देवेंद्र फडणवीसांवर खोटे गुन्हे दाखल करणे, सागर बंगल्यावर पोलीस पाठवणे, हे करणारे, त्यांना अचानक पुतना मावशीचं प्रेम आलं आहे. आम्ही 22 जून 2022 ला उठाव केला, आज 30 तारीख आहे तेव्हा देखील याच तारखेला माझा शपथविधी झाला होता, हा योगायोग आहे, असं म्हणत शिंदेंनी ठाकरेंना डिवचलं.