Sangli| कृष्णा नदीत रंगला होडयांच्या शर्यतीचा थरार, सांगलीवाडी तरुण मराठा बोट क्लबनं पटकावलं बक्षीस

सांगलीच्या कृष्णा नदीत आज पुन्हा एकदा परंपरा,साहस आणि थराराचा संगम पाहायला मिळाला.दुथडी भरून वाहणाऱ्या कृष्णा नदीच्या पात्रात पार पडलेल्या पारंपरिक होड्यांच्या शर्यतीने सांगलीकरांची मने जिंकली.सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील दहा हून अधिक संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला..भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णाराज महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत या स्पर्धेचा शुभारंभ झाला.तर चुरशीच्या या लढतीत सांगलीवाडीच्या तरुण मराठा बोट क्लबने प्रथम क्रमांक पटकावत मानाची गदा आपल्या नावावर केली.

संबंधित व्हिडीओ