Sanjay Raut| उपकार मोजायचे नसतात, ते करायचे असतात; पुस्तकाचं प्रकाशन, राजकीय टशन | NDTV मराठी

उपकार मोजायचे नसतात, ते करायचे असतात, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी अमित शाहांना टोला लगावलाय.. उपकराची फेड ही कृतज्ञतेने करायची की अपकाराने करायची हे ज्याचे त्याने ठरवायचे असतं, असंही त्यांनी म्हटलंय.. बाळासाहेबांनी शाहांना मदत केल्याचा संदर्भ देत त्यांनी हा टोला लगावलाय.. हम गुंडे लोग है, तुरुंगात जायला घाबरत नाही, असं वक्तव्य संजय राऊतांनी केलंय.. मुंबईत खासदार संजय राऊतांच्या 'नरकातला स्वर्ग' या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं.. त्यावेळी उद्धव ठाकरे, शरद पवार, ज्येष्ठ लेखक जावेद अख्तरांची उपस्थिती होती.

संबंधित व्हिडीओ