राज्यात School Bus च्या भाड्यात 15% वाढीचा निर्णय; जून महिन्यापासून स्कूल बस भाडेवाढीचा नवीन दर लागू

राज्यात स्कूल बसच्या भाड्यात 15 टक्के वाढ करण्यात आलीय.महाराष्ट्रातील शाळा बस मालक संघटनेने 2026-27 शैक्षणिक वर्षापासून भाड्यात १५ टक्के वाढ करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. वाढत्या डिझेलच्या किमती, कर्मचारी वेतन, वाहन दुरुस्ती खर्च, विमा प्रीमियम, टोल आणि इतर ऑपरेशनल खर्च यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे संघटनेने स्पष्ट केले. भाडेवाढ टाळण्यासाठी सरकारकडे अनेक वेळा विनंती करण्यात आली होती, मात्र त्यास प्रतिसाद मिळाला नसल्याची तक्रारही संघटनेने केली. जून २०२६ पासून नवीन दर लागू होणार असून या निर्णयाचा थेट परिणाम पालकांच्या खर्चावर होणार आहे. त्यामुळे पालक वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

संबंधित व्हिडीओ