परभणीतील गंगाखेड रोडवरील शांतिनिकेतन कॉलनी परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे धोकादायक स्थिती निर्माण झाली. सायकलवरील एक शाळकरी मुलगा पाण्याच्या प्रचंड प्रवाहात नाल्यात सायकलसह वाहून गेला. सुदैवाने स्थानिक नागरिकांच्या तत्परतेने थोडक्यात त्याचा जीव बचावला. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.