नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पाला 20787 कोटी रुपयांची तरतूद राज्य मंत्रिमंडळाने केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात शक्तीपीठ महामार्गाला विरोध असताना देखील सरकारने शक्तीपीठसाठी मोठे पाऊल उचलले आहे. कोल्हापूर जिल्ह्याला वळसा घालून शक्तिपीठ महामार्ग तयार केला जाणार आहे. वर्धा जिल्ह्यातल्या पवनार ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या पत्रादेवीपर्यंत हा महामार्ग असणार आहेत. दरम्यान काही मंत्र्यांचा आणि शेतकऱ्यांचा या प्रकल्पाला विरोध असल्याचं चित्र आहे. महामार्गाला होत असलेला विरोध पाहता, विरोधकांचं मन वळवण्यासाठी एक कृतीआराखडा निश्चित करण्यात आलाय. या आराखड्यानुसार जिथं विरोध आहे, तिथं मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीने मार्ग काढला जाणार आहे.मात्र महामार्ग शेतकऱ्यांवर लादला जावू नये अशी भूमिका काही मंत्र्यांनी कॅबिनेटमध्ये घेतल्याची माहिती मिळतेय.