माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांनी आपल्या खासगी वाहनचालकाच्या चारही मुलांना महानगरपालिकेत नोकरी दिल्याचे उघड झाले आहे. आरटीआय कार्यकर्ते युसूफ अली बोहरा यांनी माहिती अधिकारात मिळवलेल्या कागदपत्रांमधून हे समोर आले आहे. या नियुक्त्या ठेकेदारी पद्धतीने झाल्या आहेत. विशेष म्हणजे, यासाठी कोणत्याही अधिकृत रिक्त पदांची जाहिरात काढण्यात आली नव्हती.