शिर्डीत ठाकरे गटाच्या मेळाव्यात पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरची चर्चा रंगलीय. निमित्त ठरलं ते उबाठाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरेंच्या गैरहजेरीचं..या मेळाव्याला खासदार वाकचौरे अनुपस्थित असल्याने ते शिंदेंच्या शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा नव्याने रंगलीय..त्यावर अविरोधकांकडे जाऊ नका, असं आवाहन चंद्रकांत खैरेंनी कुणाचंही नाव न घेता केलंय.