वाढत्या महागाईविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेने मुंबईत आंदोलन केलंय. मुंबईच्या भायखळा परिसरात हे आंदोलन करण्यात आलंय. 'इंधन दरवाढ रद्द करा, आणि महागाईवर नियंत्रण आणा' अशी मागणी आंदोलकांनी केलीय. खासदार अरविंद सावंत आणि आमदार अजय चौधरींच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलंय. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं पदाधिकारी उपस्थित होते.