सीना नदीला महापूर! सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील सोळा गावांना सीना नदीच्या पुराचा मोठा फटका बसला आहे. उंदरगावात पाणी शिरल्याने शेकडो नागरिकांचे स्थलांतरण करण्यात आले आहे. यात एका वृद्ध दाम्पत्याचा समावेश आहे; पुराच्या पाण्यामुळे त्यांचे कपडे, अंथरूण-पांघरूण वाहून गेले आहेत. हे वृद्ध दाम्पत्य गेल्या पाच दिवसांपासून शाळेच्या खोलीत आसरा घेत आहेत.