नाशिकच्या सिन्नर तालुक्याला रविवारी सायंकाळी मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले.जवळपास दोन तासातच 144 मिलिमीटर पाऊस सिन्नरमध्ये झाला. यामुळे तालुक्यातील अनेक रस्त्यांना तळ्याचं रूप आलं होतं.शहरातील सरस्वती नदी यासोबतच देव नदीच्या पाणीपातळीतही मोठी वाढ झाली.या पावसामुळे शेती पिकाचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पावसामुळे सिन्नर बस टर्मिनलचा स्लॅब देखील कोसळला. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी एक शिवशाही बस आणि एका अल्टो कारचे नुकसान झाले आहे.