विदर्भासह वाशिम जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत्या उष्णतेने 44 अंशाचा टप्पा ओलांडला आहे.या प्रचंड उकाड्याचा परिणाम आता वाशिमच्या फळेगाव येथील लघु सिंचन प्रकल्पावर झाला असून,प्रकल्प पूर्णतः आटला आहे.त्यामुळं गावातील विहिरी, बोअरवेल आणि स्थानिक जलस्रोतांचा पाणीसाठा झपाट्याने खालावत चालला असून ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर झाला आहे.तर उन्हाळी पिके सुकण्याच्या मार्गावर असल्याने शेतकऱ्यांसह ग्रामस्थांसमोर मोठं संकट उभं राहाल आहे.या परिस्थितीचा थेट लघु सिंचन प्रकल्पातून आढावा घेतलाय आमचे वाशिमचे प्रतिनिधी साजन धाबे यांनी.