सोलापूरच्या अक्कलकोट रोड एमआयडीसीत भीषण आग लागली आहे.सोलापुर शहरातील अक्कलकोट रोड एमआयडीसी भागात कारखान्याला भीषण आग लागल्याची माहिती समोर येतेय.सेंट्रल इंडस्ट्री या कारखान्याला मध्यरात्री तीनच्या सुमारास भीषण आग लागली.आगीत तिघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळतेय.तर अद्याप ही 5-6 जण कारखान्यात अडकल्याची माहिती मिळतेय. घटनास्थळी अग्निशमन दलाची मोठी टीम पाहोचली आहे तर पोलिसांचा ही मोठा बंदोबस्त तैनात आहे.