Solapur | आरोग्य विभागाचा गंभीर प्रकार, खोट्या HIV अहवालामुळे गर्भवतीचा संसार उद्ध्वस्त | NDTV मराठी

सोलापूर जिल्ह्यातून आरोग्य विभागाचा गंभीर प्रकार समोर आला आहे. अकलूज येथील शासकीय आयसीटीसी केंद्रातून एका गर्भवती महिलेला चुकीचा एचआयव्ही पॉझिटिव्ह अहवाल देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. अहवालामुळे पती आणि सासरकडील मंडळींनी तिच्यावर संशय घेत घराबाहेर काढले. विविध शासकीय, खासगी केंद्रांवर तपासणी केल्यावर सर्व अहवाल एचआयव्ही निगेटिव्ह आल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे आयसीटीसीच्या निष्काळजीपणावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. जिल्हा शल्यचिकित्सक अधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घेत तीन सदस्य समिती स्थापन केली. येत्या आठ दिवसात सर्व प्रकरणाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कारवाईची आश्वासन देण्यात आलं.

संबंधित व्हिडीओ