विधान परिषद निवडणुकीत सोलापुरात मोठं नाट्य रंगलंय. काँग्रेसचे उमेदवार आदित्य फत्तेपुरकर यांच्या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून सही करणाऱ्या नागेश भोसलेंनी अर्जावरची सही आपली नसल्याचा दावा केलाय, त्यामुळे काँग्रेस उमेदवाराचा अर्ज बाद झालाय. यावरून नागेश भोसले आणि आदित्य फत्तेपुरकर यांच्या आरोप प्रत्यारोप रंगलेत. "माझी सही खरी आहे की नाही हे न्यायालय ठरवेल, त्यामुळे मी कुठल्याही चौकशीला सामोरे जायला तयार असल्याचं भोसलेंचं म्हणणं आहे. तर दुसरीकडे जिल्हाधिकारी हे सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप करत आपण जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात कोर्टात धाव घेणार असल्याची माहिती फत्तेपुरकर यांनी दिलीय.