Sonam Dongre case| सोनम डोंगरे प्रकरण | MNS- NCP आक्रमक; आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन

नवी मुंबईतील सोनम डोंगरे प्रकरणावरून मनसेच्या कार्यकर्त्यांनी महापालिका आयुक्त कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने केली. "बेजबाबदार वैद्यकीय अधिकाऱ्यांचे करायचे काय?" अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला.आंदोलकांनी आयुक्त कार्यालयात प्रवेश करून संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली..नवी मुंबईतल्या गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणावरून नवी मुंबई महापालिकेत पवारांची राष्ट्रवादी आक्रमक झालीय. महापालिकेच्या ऐरोली रुग्णालयात चुकीच्या उपचारामुळे काल एका गरोदर महिलेचा मृत्यू झाला होता. निष्काळजीपणा आणि दुर्लक्षाचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिका आयुक्तांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केलंय. महापालिकेच्या बेजबाबदार वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करत मृत महिलेच्या कुटुंबाला न्याय देण्याची मागणी त्यांनी केलीय.

संबंधित व्हिडीओ