एनडीटीव्ही मराठीने गेल्या काही दिवसांपासून RTO मधल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांची पोलखोल करण्याची वृत्तमालिका सुरू केलीय. याच वृत्तमालिकेतला आजचा स्पेशल रिपोर्ट पाहून तुम्हाला धक्का बसेल. कारण RTOमधल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या वसुली रॅकेटविरोधात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी राज्याच्या मुख्य सचिवांकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीला तब्बल सहा वर्ष उलटून गेलीत, तरीही या अधिकाऱ्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे हे वसुली रॅकेट किती प्रबळ आहे, याचा अंदाज येतोय. पाहूयात एक रिपोर्ट