औषध निरीक्षक भरती प्रक्रियेत गैरप्रकार आणि पेपरफुटीच्या आरोपांनंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने संपूर्ण भरती प्रक्रियाच रद्द केलीय. पोलिसांच्या प्राथमिक चौकशी अहवालात पेपरफुटी झाल्याची बाब उघड झाल्यामुळे आयोगाला अखेर ही भरतीच रद्द करावी लागलीच, पण या निमित्ताने गैरप्रकार आणि पेपरफुटीच्या आरोपांवर अखेर शिक्कामोर्तब झालंय. त्यामुळे 'पेपर फुटलाच नाही' हा MPSC चे अध्यक्ष विवेक भीमनवार यांचा दावा फोल ठरलाय. पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट..