छगन भुजबळांना नाशिकचे पालकमंत्री करा, अशी मागणी नाशिकमध्ये जोर धरु लागलीय. तसे बॅनर्सही नाशिकमध्ये लागलेत... नाशिकमध्ये प्रचंड खड्डे असल्यानं गिरीश महाजनांवरचा रोष वाढतोय.... मुळात नाशिकचा पालकमंत्री कोण... याचा निर्णय दोन वर्षं झाली तरी सरकारला घेता आलेला नाही.... त्यातच नाशिकमध्ये प्रचंड खड्डे पडलेत.... या सगळ्यावरुन महायुतीत आता खटके वाढायला लागलेत.... पाहुया नाशिकमधले खड्डे, खटके आणि त्यावरचे राजकीय फटके