सहा खासदारांनी धोका दिल्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांच्या सहा मतदारसंघात निष्ठेची वज्रमूठ अशा सभा घेतल्या.... तिथून मुंबईत परतताच ठाकरेंना मोठा धक्का बसला तो सचिन अहिर यांच्या रुपानं... आता डॅमेज कंट्रोलसाठी ठाकरेंनी बेस्ट कामगारांची तातडीनं बैठक घेतली... मात्र नंतर डॅमेज कंट्रोल करण्यापेक्षा उद्धव ठाकरे आधीच सावध का राहात नाहीत..असा प्रश्न आहे.... कारण उद्धव ठाकरेंनी एक चूक केली नसती तर आज कदाचित सचिन अहिरांना इतक्या सहजासहजी शिंदेंच्या मदतीने विधानपरिषद उपसभापती होणं शक्य झालं नसतं... काय होती उद्धव ठाकरेंची ती एक चूक... आणि जे पवारांना जमलं ते ठाकरेंना का शक्य झालं नाही.... पाहुया हा स्पेशल रिपोर्ट