ICSE बोर्डाच्या पहिलीच्या पुस्तकातील मराठी विषयातील चुका NDTV ने समोर आणल्यानंतर या प्रकरणाची दखल आता राज्य सरकारच्या वरिष्ठ पातळीवर घेण्यात आली आहे. मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी हे प्रकरण गंभीर असल्याचं मान्य करत शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याशी चर्चा केली आहे. तसेच दादा भुसे यांनी तातडीने पावले उचलत या संदर्भात केंद्र सरकारशी पत्रव्यवहार सुरू केल्याची माहितीही उदय सामंत यांनी दिली आहे. त्यामुळे शालेय पाठ्यपुस्तकांमधील त्रुटींवर आता काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.