नंदुरबार जिल्ह्यात उष्णतेची लाट तीव्र झाली असून, तापमानाचा पारा थेट ४३ अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. या असह्य उन्हामुळे जनजीवन पुरतेपणे विस्कळीत झाले आहे. दुपारच्या सुमारास उन्हाची तीव्रता इतकी जास्त होती की, अनेक ठिकाणी रस्त्यांवरील डांबर वितळल्याचे चित्र समोर आले आहे. यामुळे वाहनचालकांना आणि नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. डांबर वितळल्याने रस्त्यांवर चिकटपणा निर्माण झाला असून, वाहनांची गती मंदावली आहे. अचानक वाढलेल्या या तापमानामुळे नंदुरबारकर हैराण झाले आहेत. नागरिक घराबाहेर पडणे टाळत असून, थंडपेये आणि अन्य शीत पदार्थांचा आधार घेत आहेत.