Hindi सक्तीविरोधातील मोर्चात ठाकरे बंधू एकत्र,यावर काय म्हणाले संजय राऊत आणि संदीप देशपांडे? | NDTV

मराठी भाषेसाठीच्या मोर्चात एकत्र येणाऱ्या ठाकरे बंधुंची 5 जुलैला हिंदी सक्तीविरोधात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार आहेत. गिरगावात मनसे मोर्चा काढणार असून या मोर्चात मराठी माणूस आणि सर्वपक्षीयांना सहभागी होण्याचं आवाहन केलंय.दरम्यान राज ठाकरेंनी संजय राऊत यांना फोन करुन मोर्चात येण्याचं आवाहन केलं.तेव्हा राऊत आणि राज ठाकरेंमध्ये चर्चा झाल्यानंतर 6 तारखेला आषाढी एकादशीमुळे मोर्चा 5 तारखेला करण्यात आलाय. दरम्यान आज सकाळी संजय राऊतांनी ट्विट करुन 5 तारखेच्या मोर्चात सहभागी होऊ असं जाहीर केलंय. त्यामुळे आता 5 जुलैच्या मोर्चात दोन्ही ठाकरे एकत्र दिसणार का हे पाहावं लागेल.

संबंधित व्हिडीओ