Re-NEET परीक्षेच्या निकालात गडबड झाल्याचा कांगावा करणाऱ्या याचिकाकर्त्यांना औरंगाबाद खंडपीठाने चांगलाच दणका दिला आहे. निकालावर संशय घेणाऱ्या चारही याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने पूर्णपणे फेटाळून लावल्या आहेत. इतकेच नाही तर, बिनबुडाचे आणि चुकीचे दावे करून न्यायालयाचा वेळ वाया घालवल्याबद्दल प्रत्येक याचिकाकर्त्याला तब्बल ५,००० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.