चंद्रपुरात बँक अधिकाऱ्यांनी एका शेतकऱ्यांसोबत संतापजनक कृत्य केलंय. शेतकऱ्याने शेतीसाठी पीक कर्ज घेतले होते.. कर्जाची परतफेड करू न शकल्याने बँकेचे काही अधिकारी वसुली करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी बैलजोडीची जप्ती करतो, अशी धमकी देत बँकेच्या कर्मचाऱ्याने शेतकऱ्याकडून दोनशे रुपयांची लाच घेतल्याचा प्रकार समोर आला. या प्रकाराचा व्हीडिओ सध्या समाजमाध्यमात चांगलाच व्हायरल होत आहे. शेतकरी बँकांकडून पीक कर्ज घेत असतो. मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे तसेच चांगला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्याला असलेले अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. यामुळे बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करू शकत नाही. यामुळे थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांकडून कर्ज वसुली करण्यात येत आहे. अशाच प्रकारे चंद्रपूर जिल्ह्यात काही अधिकारी शेतकऱ्याकडे वसुलीसाठी आले होते. मात्र शेतकऱ्याकडून लाच घेऊन गेल्याचा प्रकार समोर आला आहे.