Pune मध्ये आंबा महोत्सवात कोट्यवधी रुपयांची उलाढाल, पणन महामंडळाच्या सुहास काळे यांच्याशी खास बातचीत

पुण्यातील आंबा महोत्सवात कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली आहे.विशेषतः कोकणातील देवगड हापूसला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. कारण यंदा ह्या हापूसला जी आय मानांकन मिळाल्याने पुणेकरांना खात्रीशीर असा हा देवगड हापूस आंबा या आंबा महोत्सवात मिळतो आहे. १ एप्रिल ते ३१ मे २०२५ पर्यंत आंबा महोत्सव चालणार आहे. गुलटेकडी परिसरातील ६० स्टॉलची उलाढाल ९० लाखाहून अधिकची तर इतर चार ठिकाणाची एकूण विक्री ही कोट्यवधीचा आकडा पार करताना दिसत आहे. यासंदर्भात पणन महामंडळाचे देश विदेश व्यापाराचे प्रमुख सुहास काळे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी.

संबंधित व्हिडीओ