Uddhav-Raj Meeting | राज्याच्या राजकारणातली आजची सर्वात मोठी बातमी, मातोश्री'वर ठाकरे बंधूंची भेट

राज्याच्या राजकारणातली आजची सर्वात मोठी बातमी.. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुन्हा एकदा मातोश्रीवर पोहोचले.. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये मातोश्रीवर जवळपास अर्धा चर्चा झाल्याची माहिती आहे.. त्याआधी संजय राऊतांच्या घरी एका कौटुंबिक कार्यक्रमालाही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र होते. संजय राऊतांच्या नातवाच्या बारशाला दोन्ही भाऊ एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. मात्र जसा कार्यक्रम संपला तसे राज ठाकरे थेट मातोश्रीवर पोहोचले.. मातोश्रीवर दाखल होण्याची ही राज ठाकरेंची दुसरी वेळ आहे. याआधी उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाला राज ठाकरे मातोश्रीवर गेले होते. महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही भाऊ एकत्र असल्याच्या चर्चा सुरु आहेत. आणि आज राज ठाकरे पुन्हा मातोश्रीवर दाखल झाल्यानं या चर्चांनी जोर पकडलाय.

संबंधित व्हिडीओ