देशावर संकट आलं तर आम्ही कायम पंतप्रधानांसोबत असणार असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलंय.त्याचबरोबर काश्मीर आपलं आहे आणि आपलंच आहे, असंही ठाकरेंनी म्हटलंय.दगाबाज मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा, भाजप दगाबाज मित्र निघाला अशीही टीकाही उद्धव ठाकरेंनी केलीय.शिवसेना भवनात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक पार पडली त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केल्याची माहिती मिळतीय. त्याचबरोबर एकवेळ देशात भाजप राहणार नाही पण काश्मीर आपलं राहील असंही ठाकरे म्हणालेत.