जळगाव जिल्ह्याला गेल्या सात दिवसांपासून वादळी वाऱ्यासह गारपीट आणि अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. या वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे शेत पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. जिल्ह्यात सुमारे सात हजार दोनशे हेक्टर वर पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल सादर करण्यात आलाय.