देवस्थानाचा पैसा वापरा! राज्यातील शेतकऱ्यांवर आलेल्या संकटासाठी सरकारने भरपूर मदत करावी, अशी मागणी पंढरपूरच्या नामदेव पायरीवर असलेल्या शेतकरी-वारकऱ्यांनी केली आहे. सरकारकडे खूप पैसा आहे आणि आवश्यक असल्यास देवस्थानांचा पैसा देखील घेऊन शेतकऱ्यांना मदत करावी, यासाठीच आम्ही विठ्ठलाला साकडे घातल्याचे त्यांनी सांगितले.