मराठी अभिनेत्री वर्षा उसगांवकर, मृणालिनी जांभळे यांच्यासह काही जणांची सुमारे 47 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आलाय.. याप्रकरणी अविनाश जाधव नावाच्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय....हा आरोपी पेशाने बिल्डर आणि निर्माता असल्याची माहिती मिळतीय. 2019–20 दरम्यान रिअल इस्टेट प्रकल्पात गुंतवणुकीचं आमिष दाखवत त्याने पैसे लाटलेत...यात वर्षा उसगांवकरांनी 11 लाखांची गुंतवणूक केली होती.. तर मृणालिनी जांभळे यांनी 15 लाखांची गुंतवणूक केली होती.. त्यांच्यासह अनेकांची यात फसवणूक झालीय.. या प्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला..