उन्हाचा पारा वाढत असल्याने वाशिम जिल्ह्यातून वाहणाऱ्या सर्वात मोठ्या पैनगंगा नदीवरील पाणी पातळी झपाट्याने घटली असून कोल्हापुरी बंधारे काही ठिकाणी पाण्याअभावी कोरडे पडले आहेत...त्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांसमोर जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे....आधीच चाऱ्याची टंचाई असताना आता पाण्याचही दुहेरी संकट निर्माण असून उन्हाळ्याचे अजून दोन महिने बाकी असल्याने ही परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे....यासंदर्भात पैनगंगा नदी परिसरातून आढावा घेऊ शेतकऱ्यांशी बातचीत केलीय आमचे वाशिमचे प्रतिनिधी साजन धाबे यांनी.