जायकवाडीतून १.५ लाख क्यूसेक विसर्ग! मराठवाड्यातून मोठी बातमी! आज दुपारी जायकवाडी धरणातून तब्बल दीड लाख क्यूसेक पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे. यंदा पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या क्षमतेने पाणी सोडले जाणार आहे. त्यामुळे मराठवाड्यातील अनेक गावांमध्ये पाणी घुसण्याची शक्यता निर्माण झाली असून, प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.