Bandra पश्चिमेत पाण्याची पाईपलाईन फुटली, पाईपलाईन फुटल्यानं रस्ते जलमय; लाखो लिटर पाणी वाया

वांद्रे पश्चिमेत पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईपलाईन फुटल्याची मोठी घटना घडली आहे.लकी हॉटेल जंक्शन परिसरात झालेल्या या घटनेमुळे लाखो लिटर पाणी वाया गेले. पाईपलाईन फुटल्याने रस्ते जलमय झाले असून पाणी परिसरातील दुकानांमध्येही शिरले आहे. त्यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे. या प्रकारामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. पाईप लाईन फुटल्याची माहिती मिळताच मुंबई महानगरपालिकेच्या एच वेस्ट विभागातील जल पुरवठा करणाऱ्या विभागातील कर्मचारी आता घटनास्थळी दाखल झाले आहेत. पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटल्यामुळे वांद्रे पश्चिम परिसरातील नागरिकांना पिण्याचे पाणी जपून वापरण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

संबंधित व्हिडीओ