आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही,पाकिस्तानला 100 किमी आत घुसून मारलं. असं वक्तव्य गृहमंत्री अमित शाह यांनी पाकिस्तानला उद्देशून केलंय. भारतीय सैन्यदलांनी पाकिस्तानच्या हवाई तळांवर तुफानी हल्ला चढवत जबर नुकसान केले होते.त्यामुळे पाकिस्तानला युद्धविरामासाठी विनवणी करणे भाग पडले होते.त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मोठं विधान केलं आहे. भारताने पाकिस्तानचे हवाईतळ उद्ध्वस्त केले.आमची एअर डिफेन्स सिस्टिम खूप मजबूत आहे. आज पाकिस्तान भयभीत झालेला आहे. असंही अमित शाह म्हणाले.