दक्षिण चीन समुद्रात पुन्हा एकदा एका चक्रीवादळानं धुमाकूळ घातलाय. जून महिन्यापासून सुरू झालेली ही चक्रीवादळांची मालिका सप्टेंबरमध्येही कायम दिसतेय. गेल्या दोन तीन दिवसांत फिलीपाईन्स,तैवान,हाँगकाँग आणि दक्षिण चीनला रागासा या चक्रीवादळानं अक्षरशः झोडपून काढलंय... हे वादळ यंदाच्या हंगामातलं सर्वाधिक शक्तीशाली वादळ मानलं जातंय. त्याचा कहर किती भयंकर आहे, कुठून आलं हे वादळ... कुठे पोहोचणार ते पाहूया एक ग्लोबल रिपोर्ट.....