भारताने काही बांगलादेशी वस्तूंवरील आयातीसाठी बंदर निर्बंध लावलेत.भारताने शनिवारपासून बांगलादेशमधून येणाऱ्या काही वस्तूंवरील आयातीसाठी बंदर निर्बंध लागू केले आहेत.यामध्ये रेडीमेड कपडे आणि प्रोसेस्ड फूड आयटम्स यांचा समावेश आहे.वाणिज्य मंत्रालयाच्या अधिपत्याखालील परकीय व्यापार महासंचालनालयाने यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे.मात्र, हे निर्बंध नेपाळ व भूतानसाठी भारतातून ट्रान्झिट होणाऱ्या बांगलादेशी वस्तूंवर लागू होणार नाहीत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.