Russia-Ukraine मधील भीषण युद्ध थांबवणार, Putin यांच्याशी थेट बोलणार; Trump यांचं विधान | NDTV मराठी

रशिया आणि युक्रेनमध्ये मागच्या सव्वा तीन वर्षांपासून भीषण युद्ध सुरू आहे. तसेच अनेक घडामोडींनंतरही हे युद्ध थांबण्याचं नाव घेत नाही आहे.या संघर्षाला थांबवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढाकार घेतला आहे.रशिया आणि युक्रेनमधील युद्ध थांबवण्यासाठी सोमवारी सकाळी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्याशी फोनवरून बोलणार आहे, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले आहे. त्यानंतर युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्याशी बोलणार आहे.तसेच त्यानंत नाटोच्या प्रतिनिधींशी चर्चा करून संभाव्य युद्धविरामाबाबत चर्चा करण्यात येईल.रशिया आणि युक्रेनमधील युद्धात दर आठवड्याला हजारो रशियन आणि युक्रेनी सैनिक मारले जात आहेत. आता हे भीषण युद्ध थांबलं पाहिजे. असं ट्रम्प यांनी म्हटलंय.

संबंधित व्हिडीओ