यवतमाळमधील धरण परिसरातील हातभट्टी दारू अड्ड्यांवर पोलिसांची धाड. दुधाना-चापडोह धरण परिसरात मोठी कारवाई.या कारवाईत तब्बल ८ हजार ३०० लिटर सडवा, मोहामाच आणि दारू निर्मितीसाठी लागणारे साहित्य नष्ट करण्यात आले. जप्त व नष्ट करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत सुमारे २ लाख ९० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.या प्रकरणी दुधाना येथील तीन आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.