60 कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्या विरोधात लूकआउट नोटीस जारी केली आहे. 'बेस्ट डील टीव्ही' या कंपनीद्वारे एका व्यावसायिकाची फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. हे दोघे परदेशी दौरे करत असल्याने पोलिसांनी हे पाऊल उचलले आहे.