Nepal Flood News l नेपाळच्या त्रिशुली शाळेतील 900 विद्यार्थी बचावले, मुख्याध्यापकाचं प्रसंगावधान अन्

नेपाळचा पूर म्हणजे केवळ मृत्यूचं तांडव नव्हे तर अनेकांच्या धैर्याची ही कथा म्हणता येईल.नेपाळच्या त्रिशुलीमध्ये एका शाळेच्या मुख्याध्यापकांच्या प्रसंगावधानतेमुले तब्बल ९०० विद्यार्थ्यांचा जीव वाचला आहे. २६ ऑगस्टला जेव्हा पूर आला तेव्हा राजेंद्र दावडी हे त्रिभुवन त्रिशुली माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक त्यांच्या कार्यालयात बसले होते.सकाळची वेळ होती, तेवढ्यात त्यांचा एक सहकारी धावत त्यांच्या कार्यालयात आला आणि त्यानं पुराच्या अलर्टची माहिती दिली.त्याचवेळी एक पालक महिला आपल्या पाल्याला शाळेतून नेण्यासाठी आली. तिलाही पुराचा इशारा समजला होता. तेवढ्यात त्यांच्या एका शिक्षकानंही अशीच माहिती समजल्याचं त्यांना सांगितलं. राजेंद्र यांनी एका क्षणाचाही वेळ न दवडता ताबडतोब शाळा सोडण्याचे आणि बसेसनं मुलांना त्यांच्या घरी पाठवण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे त्या दिवशी तब्बल ९०० विद्यार्थ्यांचा जीव वाचला.राजेंद्र यांनी त्या दिवशी तो निर्णय का घेतला याची माहिती दिली. 900 students at a school in Trishuli, Nepal, saved thanks to the headmaster's presence of mind.

संबंधित व्हिडीओ