ऐन गणेशोत्सवामध्ये सरकारची डोकेदुखी वाढणार आहे. कारण मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा थेट मुंबईत धडक देण्याची तयारी सुरु केली आहे. मुंबईत धडक देण्यासाठी जरांगेंनी गनिमी कावा वापरण्यास सांगितलंय. मुंबईत राहणाऱ्या नातेवाईक आणि पाहुण्यांचा शोध घेऊन मुंबईत मुक्काम करा. मात्र मुख्यमंत्र्यांचं वर्षा निवासस्थान तसंच आझाद मैदानाकडे जाऊ नका असं आवाहन जरांगेंनी केलंय. जरांगेंनी चलो मुंबईचा नारा दिल्यानंतर अंतरवाली सराटीत मराठा आंदोलकांनी एकच जल्लोष केला.
Maratha protesters should go and stay in Mumbai; do not be afraid even if the police detain you Manoj Jarange Patil.