पुणे आणि परिसरातील वाहनचालकांना मोठा आर्थिक झटका बसला आहे. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड अर्थात एमएनजीएलने CNGच्या दरात प्रतिकिलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. त्यामुळे ३१ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून CNGचा दर ९७ रुपये ७५ पैसे प्रतिकिलो झाला आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड, चाकण, तळेगाव, हिंजवडी आणि नाशिक परिसरात ही दरवाढ लागू होणार आहे. पश्चिम आशियातील तणाव, LNGच्या वाढलेल्या आयात खर्चाचा परिणाम आणि देशातील वाढती मागणी यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, घरगुती PNGच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.