मिरा-भाईंदरमधील भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर नाट्यगृहातील गैरसोयींवरून सुरू झालेला वाद आता आणखी चिघळताना दिसतोय. नाट्यगृहातील एसी बंद असल्याचा मुद्दा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उपस्थित केला होता. महापौर आणि महापालिका आयुक्तांना प्रत्येकी 100 रुपयांचा मनीऑर्डर पाठवण्याचे आवाहन त्यांनी केले होते. त्यानंतर आज शिवसैनिकांनी मिरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्तांना 100 रुपयांचा मनीऑर्डर पाठवत प्रशासनाच्या कारभाराचा निषेध केला. दरम्यान, लता मंगेशकर नाट्यगृहातील गैरसोयींशी संबंधित आणखी एक व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल होतोय. अभिनेत्री प्रिया बापट आणि अभिनेता उमेश कामत यांच्या ‘जर तर ची गोष्ट’ या नाटकाच्या प्रयोगादरम्यानही अनेक तांत्रिक त्रुटी समोर आल्याचा दावा करण्यात आला आहे. प्रयोगादरम्यान लाईटची योग्य व्यवस्था नसल्याने पर्यायी लाईटची व्यवस्था करावी लागल्याचे कलाकारांनी प्रेक्षकांसमोर सांगितल्याचं दिसतंय.
Allegations of poor facilities at the Mira Road theatre; Priya Bapat and Umesh Kamat share a video regarding the issues.