Shivsena कामाचे रिपोर्ट कार्ड पाहून मंत्रिमंडळात बदल करा, Rajesh Kshirsagar यांचा पक्षाला घरचा आहेर

शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी पक्षातील मंत्र्यांच्या कारभारावर जोरदार ताशेरे ओढत घरचा आहेर दिलाय.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पक्षवाढीसाठी अहोरात्र मेहनत घेत असताना बाहेरून आलेल्या काही नेत्यांना सहजासहजी मंत्रीपद मिळाल्याने त्यांना संघटना विस्ताराचे महत्त्व उरलेले नाही, अशी बोचरी टीका करत शिंदेंनी मंत्र्यांच्या कामगिरीचे तात्काळ ‘रिपोर्ट कार्ड’ घ्यावे, अशी आक्रमक मागणी क्षीरसागर यांनी केलीय.. गेल्या ४० वर्षांपासून निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून संपूर्ण संघटना सोबत आणूनही मंत्रीपदापासून दूर ठेवल्याची उघड खंत व्यक्त केलीय. अडीच वर्षांनंतर कामगिरीचे रिपोर्ट कार्ड पाहून मंत्रीमंडळात बदल करण्याचे पक्षाने दिलेले आश्वासन आता नेत्यांनी पाळायला हवे आणि आपल्याला तात्काळ मंत्रीपद दिले पाहिजे, असा ठाम दावा क्षीरसागर यांनी केलाय. Reshuffle the cabinet based on performance report cards: Rajesh Kshirsagar’s blunt message to the party.

संबंधित व्हिडीओ