Chembur News | केमिकल टँकरमधून गळती, 2 किमीपर्यंतची वाहतूक बंद; बॉटम बॉलमधून बेन्झीन रसायनाची गळती

मुंबईतील चेंबूर परिसरात आज केमिकल टँकरमधून गळती झाल्याने खळबळ उडाली आहे. सुमारे २२ हजार टन क्षमतेच्या टँकरच्या बॉटम बॉलमधून बेन्झीन या रसायनाची गळती सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस आणि इतर यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या असून गळती थांबवण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव चेंबूर परिसरातील जवळपास दोन किलोमीटरपर्यंतचा वाहतुकीचा मार्ग बंद करण्यात आला असून परिस्थितीवर प्रशासनाचे बारकाईने लक्ष आहे.

संबंधित व्हिडीओ