नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी महापुरानंतर परिस्थिती दिवसेंदिवस अधिक भीषण होत चालली आहे. हजारो कुटुंबं उद्ध्वस्त झाली आहेत, गावच्या गावं जमीनदोस्त झाली आहेत मृतदेहांची संख्या इतकी मोठी आहे की अनेक ठिकाणी डीएनए नमुने घेऊन अज्ञात मृतदेहांचे सामूहिक दफन सुरू करण्यात आले आहे. मृतांचा आकडा ८०० पार गेलाय.तर हजारो नागरिक अजूनही बेपत्ता आहेत.या पुरानं नेपाळचा चेहरामोहराच बिघडवला आहे. यातून सावरण्याचं आव्हान आता नेपाळ समोर आहे. नेपाळमधील या भीषण आपत्तीवरचा हा विशेष अहवाल...