कोल्हापुरातील गोकुळ दूध संघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापलं आहे. पात्र आणि अपात्र संस्थांच्या हरकतींवरील सुनावणीदरम्यान दुग्ध विभागाच्या कार्यालयाबाहेर मुश्रीफ गटाच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन करत गोंधळ घातल्याचा प्रकार समोर आला आहे. काहींनी अधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्याचाही आरोप असून, संस्थांचे प्रतिनिधी दबाव टाकत असल्याने परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.