चंद्रपूर महानगरपालिकेतील महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे शिवसेनेचे तसेच वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक आज उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता आहे. काँग्रेसने ठाकरे शिवसेना आणि वंचित यांच्यासोबत सत्ता स्थापन करण्याचा दावा केला होता. मात्र,ठाकरे शिवसेनेने महापौर पदाची मागणी केल्याने या संदर्भात उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा होण्याची शक्यता आहे.. आज दुपारी बारा वाजता नगरसेवक मातोश्रीवर ठाकरेंना भेटणार आहेत...