शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांच्या महाड मतदार संघावर भाजपचा डोळा आहे. भविष्यात भाजप या मतदार संघावर दावा करू शकतो. भाजप नेते प्रवीण दरेकरांनी संकेत दिलेत... राजकारणात उद्या काहीही होऊ शकतं. आम्ही आता एकेक पाऊल टाकतोय. आमचा पक्ष गल्ली ते दिल्ली गाठलेली आहे. ग्रामपंचायत ते पार्लमेंट जाणारा आमचा पक्ष आहे. त्यामुळे भविष्यात काहीही होऊ शकतं असं दरेकर म्हणाले.तर दरेकराच्या या वक्तव्यावर गोगावलेंली आता दक्षिण रायगडमध्ये एकला चलो रे चा नारा दिलाय.... रायगडमध्ये भाजप कधी कुणाशी युती करेल सांगता येत नाही असाही गोगावलेंनी आरोप केलाय..